Marathi Bhasha Geet-文本歌词

Marathi Bhasha Geet-文本歌词

Nihar Shembekar&Dnyaneshwar Shilawane&Rohit Raut&Jayesh Khare&Savaniee Ravindrra&Nandesh Umap&Mugdha Karhade
发行日期:

पहा पहा ना मूळ पवित्र गीता ग्रंथ हो संस्कृत भाषेतला जो मधुर आणि रसाळ मराठी भाषेत हो अनुवादला अर्थ पाहिला तर ना कळो येई फरक ना कळो दोहोमधला म्हणे ज्ञानेश्वर माझ्या मराठीनं असा सुवर्णयोग हो साधला देहाचं लावण्य स्वतेजाने अलंकाराचं सौंदर्य फुलवी ना कळे कोणी कोणाला आभूषित केले असे मनाला हे भुलवी मराठी आणि संस्कृत शब्द गितेच्या सिंहासनी विराजला म्हणे ज्ञानेश्वर असा माझ्या मराठीनं सुवर्णयोग साधला शब्द सौंदर्याच्या जोरावर मराठी शृंगार रसाला जिंकणार मराठी शब्द पण साहित्य शास्त्राचे होतील अहो अलंकार संस्कृत भाषेचां जणू सुर हा मराठी भाषेला घावला मराठी भाषेच्या सौंदर्यानं संस्कृत भाषाही झाली तरुण संस्कृत भाषेतील गीतातत्व तेजस्वीतेने आले भरून म्हणुनी गीतेतील संस्कृत ज्ञानाचा साठा मराठीत दावला म्हणे ज्ञानेश्वर असा माझ्या मराठीनं सुवर्णयोग हो साधला भावार्थ भिजून जाई मराठी साहित्य रसाच्या वर्षावानं दुर्गम्य जे गीतातत्व गुंफीले मराठी भाषेतील शब्दानं चातुर्य म्हणे आम्हालाही मराठी भाषेमुळे मान लाभला म्हणे ज्ञानेश्वर असा माझ्या मराठीनं सुवर्णयोग हो साधला माय मराठी माऊली