तलप ही सारखी तुझीच लागली
लत ही लागली रोज रोजची
दिन जातो सुखी होऊन टेन्शन फ्री
ओठांना सारखी सवय ही लागली
आराम तू जीवनातला
सुखाला भेटण्याचा एक हा बहाणा तू
ओठांवरी क्षणात येणारी
चेहऱ्याची गोड गोड cute सी ही smile तू
कितीदा प्यावे तरी कमीच रे
चहाला वेळ नाही रे
पण वेळेला चहा पाहिजे
माझ्या जीवनातले
चहाच पहिले प्रेम रे !!२!!
(Female)
मन विरघळलं साखरेवानी नशा तुझी ही रोजची सुटेना
सुकून देते कटींग चहाची कितीही प्यावे तरी मन भरेना
पाहता तुला तुझीच झाले
तुला भेटण्याचे करते बहाणे
जशी ओठांना तलप चहाची
तशी ओढ तुझी या मनाला लागे
(Male)
Lovestory तुझ्या माझ्या प्रेमाची
झाली viral चहाच्या टपरीवर
एक कटींग दोघात घेऊ चल
कधी अद्रक, इलायची कधी स्पेशल
आनंद तू जगण्यातला
प्रेमात पडण्याचा एक हा बहाणा तू
मनामध्ये क्षणात येते ती
सुकून मिळणारी एक गोड feeling तू
(Female)
चहामुळेच प्रेम वाढले
चहाला वेळ नाही रे
पण वेळेला चहा पाहिजे
माझ्या जीवनातले
चहाच पाहिले प्रेम रे !!२!!