जा पाखरा नाद सोडला तुझा
डाव प्रेमाचा तू ग मोडला
डाव प्रेमाचा तू ग मोडला..
जाग जा पाखरा
तुझा नाद सोडला. !ध्रु
माझं खरं प्रेम होतं
कळल नाही तुला ग्
गोड गोड बोलुनि तू
कापलास गळा ग
माझ्या प्रेमाचा नाही ठाव लागला जाग जा पाखरा
तुझा नाद सोडला. !!१..
जपलं होतो मी गं मनापासून नातं
गेलीस सोडून राणी केलास घात..
आता अर्थ नाही उरणार ग खऱ्या प्रेमाला
नाही किंमत राहिली ग जीव लावणाऱ्याला..
अशिक सुरज सारखा नाहीं
भेटणार तुला...
जाग जा पाखरा
तुझा नाद सोडला
जाग जा पाखरा
तुझा नाद सोडला. !!२